आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक जण आपला वाढदिवस साजरा करतात. काहीजण वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवितात. पण आकुर्डी काळभोर नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मनीष काळभोर यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे .
मनीष काळभोर यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला/ यानिमित्ताने त्यांनी शहरात चिमण्यांसाठी घरे बसविण्याचा उपक्रम केला सकाळी 11 वा. शहरातील झाडांवर ही घरटी बसविण्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले . यामुळे चिमणी पाखरांना स्वतःचे घर मिळणार आहे. यानिमित्त शहरातून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना नक्कीच दिलासा मिळेल. ”या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या” या कवितेच्या चार ओळी या घरट्यांवर लावून एक प्रकारे चिमण्या पाखरांना आवाहनही केले जात आहे.
तसेच मोरया गोसावी मंदिर चिंचवड गाव येथे अभिषेक व मदर तेरेसा चॅरिटी होम येथे अन्नदान , तसेच मोहननगर येथे सनिटायझर वाटप इत्यादी कार्यक्रम करण्यात आले . व यासाठी जगदंब प्रतिष्ठान , राष्ट्रतेज तरुण मंडळ , ceo ग्रुप , हिंदवी स्वराज्य संघटना , अचानक मित्र मंडळ , जगदंब प्रतिष्ठान , खडेराया चरिटेबल ट्रस्ट.श्रीकृष्ण गणेश तरुण मंडळ H.R.S.क्लब. चांगभलं प्रतिष्ठान.श्री गणेश प्रसारक ट्रस्ट.सुर्यादय मित्र मंडळ. हनुमान मित्र मंडळ. श्री शिव मित्र मंडळ.यांचे विशेष सहकार्य लाभले .