शबनम न्युज / भोसरी
सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक गरजू नागरिकांना लॉकडाउनच्या परिस्थितीत राहावे लागले. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना यावेळी करावा लागला. अशा गरजू नागरिकांसाठी शिवसेनेचे कामगार नेते इरफान भाई सय्यद यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मदतीचा एक हात द्या’ या उपक्रमाअंतर्गत मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भोसरी करांनी भरघोस असा प्रतिसाद देत गरजू नागरिकांना अन्नदान केले.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते मा.गुलाबराव आल्हाट,उपजिल्हाप्रमुख श्री.निलेश मुटके,मा. नगरसेवक, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख.श्री. धनंजय भाऊ आल्हाट, शिवसेना समन्वयक भोसरी विधानसभा श्री.परशुराम आल्हाट, शिवसेना महिला संघटिका भोसरी विधानसभा सौ.रूपालीताई परशुराम आल्हाट, अमित आल्हाट, विनायक आल्हाट,विषाल आल्हाट वासुदेव आल्हाट, तुषार आल्हाट,संकेत चवरे , अशोक भागवत,सुधीर ठावणे, दीपक गवळी व सर्व शिवसैनिक व पदाधिकारी आदींनी योगदान दिले.