शबनम न्यूज : पुणे (दि.०९ मार्च) :- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिप ( पीमसे ) तर्फे महिला दिनानिमित्त स्त्री-भ्रूण हत्याविरोधी पथनाट्य सादर करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल कँटोन्मेंट हॉस्पिटल येथे हे पथनाट्य सादर करण्यात आले. डॉ .पोरिणिता बॅनर्जी यांनी पथनाट्यमागचा उद्देश स्पष्ट करून ‘ बेटी बचाओ, देश बचावो ‘ हे जनजागृतीचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथ नाट्याला उपस्थितांनी दाद दिली.
डॉ झरीना शेख, जफर खान यांनी संयोजन केले. ‘महिला दिन एक दिवसा करिता असला तरी स्त्री भ्रुण हत्या विरोधी जनजागृती रोज करावी लागणार आहे, त्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल ‘ ,असे डॉ. पोरिणिता बॅनर्जी यांनी सांगितले.