शबनम न्यूज : पुणे (दि.०९ मार्च) :- आय. ओ. आय.ओशन अकादमी-इंडिया प्रोग्राम आणि इंटरनॅशनल ओशन इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने तेर पॉलिसी सेंटर संस्थेने ऑनलाईन ‘सागरी प्रशिक्षण’ आयोजित केले आहे.
आयओआय ओशन अकादमी-इंडिया प्रोग्रामचे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री , तेर पॉलिसी सेंटर च्या संचालक डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नागरिकांना सोप्या भाषेत महासागर ; त्याचे महत्व ; मानवी कृतींमुळे महासागरावर होणारा परिणाम ; पर्यावरण शाश्वतेच्या दृष्टीने महासागरांचे महत्व , भारताचा किनारी प्रदेश, भारताच्या महासागर जैवविविधतेबद्दल परिचय करून देणे या प्रशिक्षणामागचा मूळ उद्देश आहे . महासागरांबदल जागरूकता निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनातील त्याचे महत्व किती आहे याची जाणीव व्हावी, यासाठी याचे आयोजन केले असल्याचे तेर पॉलिसी सेंटर च्या संचालक डॉ. विनिता आपटे यांनी दिली.
हे प्रशिक्षण सत्र २२ मार्च पासून सुरु होत आहे. साधारतः २० तासांचे आहे. रोज २ तास याप्रमाणे 10 दिवस चालेल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, मात्र https://bit.ly/3KsUcJX लिंक वर नावनोंदणी करणे आवश्यक आहे
किंवा ocean.ioi.terre@gmail.com या मेल आय डी आपला सहभाग नोंदवा. या प्रशिक्षण सत्रासाठी सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.