शबनम न्यूज | पुणे
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार (दि. 2) मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच विदर्भातील जिल्हे वगळता शनिवार (दि. 15) जून रोजी राज्य मंडळाच्या सर्व विभागातील शाळा भरविण्यात येणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
विदर्भातील जून महिन्यातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 1 जुलैपासून सुरू कराव्यात, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
Advertisement
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत 22 एप्रिल पासून सवलत देण्यात आली आहे. शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सोमवार दि. 22 पासून विद्यार्थ्यांना उपस्थिती बाबत सवलत मिळेल राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा शाळांमध्ये इतर उपक्रम राबविले जात असल्यास या सवलतींबाबत स्थानिक स्तरावर शाळा प्रशासन निर्णय घेऊ शकते.