शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रिक्षाचालक, फेरीवाले, घरकाम महिला, गटई कामगार , जिम ट्रेनर ,कष्टकरी जनतेला आर्थिक मदत दिली जाणार आहे, हा निर्णय सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे परंतु मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी या योजनेत खोडा आणला असून त्यांनी विभागीय आयुक्त यांना पत्र पाठवून अभिप्राय मागितला आहे परंतु विभागीय आयुक्तांनी याबाबत कोणताही निर्णय न दिल्यामुळे कारोना काळात गोरगरीब, कष्टकरी जनतेला होणारी मदत थांबली आहे.
यामुळे गोरगरीब कष्टकरी जनतेला आशेला लावून आर्थिक प्रश्नावर त्यांची चेष्टा करणे सुरु केली असून यात गटई कामगार आणि मागासवर्गीय समाजातील व्यक्ती असल्यामुळे जाणून बुजून त्यांना मदत नाकारले जात आहे.
यामुळे शहरातील मागासवर्गीय बहुजन कष्टकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून या प्रश्नावर कष्टकरी जनतेचे शिष्टमंडळ आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्यास गेले असता त्यांनी शिष्टमंडळास भेट देण्यास स्पष्ट नकार दिला यामुळे त्यांनी मागासवर्गीय बहुजन कष्टकऱ्यांचा अवमान, अवहेलना झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
या प्रकरणी तातडीने दखल घेऊन राजेश पाटील यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणी साठी ,
दि, १८-६-२०२१ रोजी सकाळी ११ विभागीय आयुक्त कार्यलय विधान भवन येथे , मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे,
आयुक्त राजेश पाटील हे मन माने आणि लहरी पद्धतीने कारभार करत असून योजना कोणत्या निकषांच्या आधारे राबवता येत नाही यामध्ये काही अडचणी आहेत याबद्दल नागरिकांशी कष्टकरी जनतेचे ते बोलायला तयार नाहीत अशा पद्धतीने हुकूमशहा सारखे वागत आहेत लोकशाहीमध्ये असं चालत नाही या प्रश्नावर त्यांनी चर्चा करून तातडीने योजना राबवली पाहिजेअन्यथा या प्रश्नावर पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यात सर्वसवी राजेश पाटील यांना जबाबदार धरण्यात यावे , आशा इशारा या वेळी बाबा कांबळे , यांनी दिला आहे ,