शबनम न्युज / मावळ
संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया व स्वंयभू फाऊंडेशन यांच्या वतीने आदिवासी ठाकर समाजाला ब्लँंकेट वाटप, वहानगाव शाळेला संतरंजी वाटप तसेच संजय गांधी निराधार योजनेवर नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून प्रतिक विध्या निकेतन निगडे या प्रांगणात वृक्ष रोपण कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितीत अर्चनाताई घारे, रुपाली दाभाडे, सुवर्ण राऊत, नारायण ठाकर, अजिंक्य टिळे, राजेश कंरडे, गणेश काजळे, मा सरपंच दतात्रय पडवळ, सरपंच सविता भांगरे, नवनाथ मोढवे, गणेश भांगरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय शेडगे, दत्तात्रय पडवळ, शंकर मोढवे, विशाल पाठाडे, राजेश पानसरे यांनी केले व सूत्रसंचालन ग्रा प सदस्य गणेश भांगरे यांनी केले.