अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपळे सौदागर येथील किडजी शाळेच्या रोडवर विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करावा अशी मागणी अपना वतन संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.तसेच अशा मागणीचे निवेदन त्यांनी उद्यान अधीक्षक व सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, पिंपळे सौदागर येथील गुरुकुल शाळेच्या जवळ ,किडजी शाळेला जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात येत आहे. त्याठिकाणी बऱ्याच वर्षांपासूनची जुनी झाडे अस्तित्वात होत, शासनस्तरावर वृक्ष लागवडीचे संवर्धनाचे उपक्रम सुरु असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वृक्षतोडीवर दुर्लक्ष केले जात आहे. काही जणांनी येथील वृक्षाची मोठ्या प्रमाणावर कत्तल केले आहे.त्याच्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या आहेत.
यावेळी संबंधितांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 कलम ८(१) चे उल्लंघन केले आहे. वृक्षतोड करून संबंधितांनी पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत व वृक्ष प्राधिकरण समितीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार त्यांच्याकडून ५००००/- दंड वसूल करावा.असे हि दिलेल्या निवेदनात सिद्दीक शेख यांनी म्हंटले आहे.