शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना चे औचित्य साधून श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी येथील ८४-८५ च्या १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकुण १४ प्रकारची ७५ औषधी वनस्पतीं यामध्ये शिसम, जांभुळ, फणस, बेहडा, अडुळसा, अर्जुन, कवट, करंज, बकुळ, चिंच, आवळा, वावळा, कागदी लिंबु इत्यादी वृक्षांचे वृक्षरोपण केले.
Advertisement
या कार्यक्रमासाठी श्री.जहागिरदार सर आणि श्री.खळदकरसर आवर्जुन उपस्थित राहिले होते. श्री. जाहागिरदार सरांनी या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थींचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात गौतम जाधव, अजित भोसले, राजू सुतार, किरण जाधव यांचा मोठा सहभाग होता