शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मनोज विष्णू गुंजाळ यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय पुरस्कार (राष्ट्रीय पुरस्कार) देऊन गौरविण्यात आले.
तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन ,रक्तदान, राष्ट्रीय साहसी शिबिर,जलसंवर्धन, हरीतगाव, अवयवदान, प्रौढ साक्षरता, उज्वल योजना अशा विविध उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला आहे. कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वाटप केले, तसेच रक्तदान व प्लाझ्मा दान करण्यास स्वयंसेवकांना प्रेरीत केले.
कोरोना काळात मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याबाबत समाजमाध्यमाद्वारे जनजागृती केली. याबद्दल महापौर कक्षात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक जयंत उर्फ आप्पा बगल,राजेंद्र राजापुरे, अतिश वारणे आदि उपस्थित होते.