शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
धम्म चळवळीतील जेष्ठ विचारवंत स्व.अशोकभाऊ शिलवंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृहात भावनिक वतावरणात पार पडला.
स्व.अशोक शिलवंत यांचे संविधान, अशोक स्तंभ आणि धम्म चळवळीतील योगदान मोठे असून ते ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.देशाच्या विविध भागात उभारण्यात आलेले ‘अशोक स्तंभ’ हे या संस्थेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेले व नोंदविलेले विशेष कार्य म्हणून ओळखले जाते.त्यांनी अनेक सामाजिक संस्थेचा पाया रचला आहे. या सर्व विषयावर अनेक जेष्ठ मान्यवरांनी आपल्या भावना,मत व्यक्त केले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कामगार नेते डाॅ.बाबा आढाव यांना धम्मदीप,पुणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष मानव कांबळे व
पंचशील संघ बुद्ध विहारचे माजी अध्यक्ष आर.जी.गायकवाड यांना समाजभूषण, कवीवर्य उद्धवजी कानडे आणि कवयित्री अस्मीता चांदणे यांना काव्यभूषण अशाप्रकारे विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना डाॅ.अशोक शिलवंत पुरस्कार ,ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक एकनाथ बागूल यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी महापौर माई ढोरे, माजी महापौर संजोग वाघेरे,नगरसेविका वैशाली काळभोर
माजी महापौर हनुमंत भोसले ,माई काटे, नगरसेवक नाना काटे,भाऊसाहेब भोईर,अजित गव्हाणे,पंकज भालेकर,राजूभाऊ बनसोडे, अंबरनाथ कांबळे,विजय जगताप, सागर हिंगणे, गोरख मेंगडे (सरचिटणीस – हमाल पंचायत), मारूती भापकर, गोरक्ष लोखंडे, डाॅ.पवन साळवे, राजाभाऊ गोलांडे, पुरुषोत्तम सदाफुले ,मोहम्मदभाई पानसरे,स्मीताताई कुलकर्णी, शारदाताई मुंढे, मुक्ताताई पडवळ,शेरबहाद्दूर खत्री,फजल शेख,रामदास महाडिक,शरद जाधव, रविंद्र दुधेकर, वसंत साळवे, भाऊसाहेब डोळस, अरुण चाबुकस्वार,डाॅ. प्रकाश नांगरे,प्राचार्य दत्तात्रय देशमुख,संपत गर्जे, माधव अडसुळे , धम्मराज साळवे,सुरेश कसबे, अनिल जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळेतर आभार पंचशील संघ बुद्ध विहाराचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजन अशोक सर्वांगिण विकास सोसायटीचे कार्याध्यक्ष व अशोक नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ॲड.राजरत्न शिलवंत , शिलरत्न शिलवंत यांनी केले.