शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त संत श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्रात महिला शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येत आहे. त्या निमित्ताने मा. श्री विशालमहाराज रघुनाथ गडगे ,उपाध्यक्ष, श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य तसेच मा. आप्पा शेलार मामा,उपाध्यक्ष, संताजी महाराज जगनाडे तेली संस्था महाराष्ट्र राज्य यांनी आज आदर्श शिक्षण संस्थेत येऊन पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिप्रेत आदर्श शैक्षणिक कार्य मुख्याध्यापिका व प्रभाग क्रमांक पाच कार्यक्षम नगरसेविका प्रियांका प्रवीण बारसे यांच्या हातुन घडत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी विशाल महाराज गडगे यांनी मनोगतातून गेली पंधरा वर्षापासून आपण ताईंना ओळखत असून शाळेच्या माध्यमातून तसेच नगरसेवकाच्या माध्यमातून ताई जे कार्य भोसरी परिसरात चालू आहे त्याबद्दल कौतुक केले व असेच कार्य त्यांच्याकडून घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या. सर्व महिलांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई ,जिजाऊ व्हा आणि समाजाला ,कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या अशी सदिच्छा व्यक्त केली.
तर संताजी महाराज जगनाडे तेली संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आप्पा शेलार मामा यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा मार्ग दाखवून दिला आहे आणि त्याच मार्गाने प्रियंकाताई बारसे आज समाजात काम करताना दिसत आहे. असं शिक्षणाचं व्रत जर सर्व महिलांनी घेतलं तर समाज निश्चितच एका चांगल्या मार्गाने प्रगती करणार आहे त्यासाठीच त्यांनी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असे म्हणून महिलांना सक्षम होण्याचा संदेश दिला आहे
नगरसेविका मुख्याध्यापिका प्रियांका बारसे यांनी आपल्या मनोगतातून आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सावित्रीबाईंना अभिप्रेत शैक्षणिक कार्य माझ्या हातून घडत असल्याच्या कार्याचा गौरव विशाल महाराज व शेलार मामा यांनी केला आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महिलांनी अधिक कार्यक्षम होणे गरजेचे आहे तसेच अन्यायाविरुद्ध लढणे गरजेचे आहे न घाबरता महिलांनी एकमेकींना साथ दिली तर समाजामध्ये आपण बदल घडू शकतो ,अनिष्ट चालीरीतींना लगाम चालु शकतो असा संदेश उपस्थित महिलांना दिला.