शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ जानेवारी) :- पिंपरी चिंचवड शहरातील फ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. १ चिखली येथे दि. १२ जानेवारी २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली मधील गट नं. 1325,1326,1371,1622 असलेले अनधिकृत बांधकामे पत्राशेड इत्यादींवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मध्ये ७ पत्राशेड ७ आरसीसी व वीट बांधकाम असे एकूण १५ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदर कारवाईचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ३२ हजार ३५५ चौरस फूट आहे.
सदर कारवाई मा. सह शहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता संजय तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुधीर मोरे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, उप अभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता विश्वनाथ राऊत व इतर दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -१० क व फ क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण पथक अतिक्रमण विभागाचे २० पोलीस कर्मचारी, चिखली पोलिस स्टेशनचे पीएसआय – १, पोलिस कर्मचारी – २ , महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षक – ५४, वैद्यकीय विभागाचे रुग्णवाहिका विद्युत विभागाचे कर्मचारी, मजूर – २० , जेसीबी – २ , पोकलेन – ३ , जॉ – कटर -१ यांच्या सहाय्याने करण्यात आली.