नगरसेविका मनिषा पवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
फक्त महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वतीने, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनात जागतिक महिला दिनानिमित्त थेरगाव परिसरातील महिलांसाठी लावण्य ही अप्सरा हा नृत्य व संगीतमय कार्यक्रम, दहा मार्च रोजी रामकृष्ण मोरे सभागृह येथे दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे नगरसेविका मनीषा प्रमोद पवार व युवा नेते प्रमोद पवार यांच्या वतीने थेरगाव परिसरातील महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे,
याबाबत आपल्या प्रतिक्रिया देताना नगरसेविका मनीषा पवार यांनी सांगितले की, मागील दोन वर्षापासून कोरोना काळात आपल्या परिसरातील महिला, भगिनी या कोणत्याही अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्या नाहीत, कोरोना काळ हा अतिशय महाभयंकर व दुःखदअसा होता या काळात अनेक अडचणींचा महिला भगिनींना सामना करावा लागला त्यांच्या मनोरंजनासाठी या जागतिक महिला दिनानिमित्त हा नृत्य व संगीतमय कार्यक्रम आयोजित करून महिलांना आनंद मिळावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व थेरगाव परिसरातील महिला भगिनींनी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे.