शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार तथा माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस मागील एक महिन्यांपासून विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधत रहाटणी परिसरातील भाजपचे युवा नेते देविदास अप्पा तांबे यांच्या वतीने रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी, महिलांनी ,लहान मुलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी घेतला कोरोना काळा नंतर च्या काळात आपले आरोग्य चांगले रहावे ,आरोग्याच्या समस्या कमी व्हाव्यात ,यासाठी प्रत्येक जण उपाययोजना करीत आहेत. सामान्य नागरिकांनाही आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत व्हावी या निमित्ताने हे आरोग्य शिबीर अत्यंत महत्त्वाचे ठरले, रहाटणी परिसरातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला व युवा नेते देविदास अप्पा तांबे यांचे आभार व्यक्त केले.
तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणी परिसरातील तमारा सोसायटीमध्ये युवक-युवतींसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतही अनेक युवक-युवतींनी सहभाग घेतला या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.
या बक्षीस वितरण समारंभा मध्ये या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे तसेच दीपक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती पुढील काळात आपण भाजप या राजकीय पक्षाच्या माध्यमातून अशी अनेक सामाजिक उपक्रम राबविणार असून तसेच प्रभागाच्या विकासाकरिता आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी देविदास अप्पा तांबे यांनी दिल्या.