राष्ट्रवादीच्या शहरअध्यक्षा कविता ताई आल्हाट प्रमुख उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( पुणे ) (दि.२२ एप्रिल २२ ) :- भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 21 मार्च रोजी दुपारी तीन वाजता जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र येरवडा पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल व स्त्री शक्ती जागरण मंच यांच्या वतीने तसेच राष्ट्रवादी च्या झोपडपट्टी सेल अध्यक्षा सुनीताताई अडसुळे यांच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र व भारतीय संविधान वितरण तसेच अन्नदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी च्या शहर अध्यक्षा कविता ताई आल्हाट प्रमुख उपस्थित होत्या.
सामाजिक समतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य चंदनासारखे झिजवले अशा महामानवाच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने येरवडा येथील बाल सुधारगृह तील मुलांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके व भारतीय संविधानाचे वितरण करण्यात आले ज्यामुळे या बालसुधारगृहातील मुलांवर चांगले संस्कार घडतील व त्यांचे भावी जीवन देशाच्या जडणघडणीसाठी उपयोगी पडेल या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया सुनिताताई अडसुळे यांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी बाळ सुधार गृहाचे अधीक्षक जी. एन. पडघन साहेब यांचा राष्ट्रवादी च्या शहर अध्यक्षा कविता ताई आल्हाट यांच्या हस्ते महात्मा फुलेंची पगडी, उपरणे, व भारताचे संविधान देऊन सन्मान करण्यात आले व सर्व राष्ट्रीय नेत्यांचे पुस्तक देण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष कविताताई अल्हाट यांच्या सह भोसरी पोलीस स्टेशन निरीक्षक नितीन लांडगे , कविताताई खराडे, युवराज दादा गायकवाड, काशिनाथ गायकवाड, अमित कांबळे, इंद्रजीत सकट ,गौतम वानखडे, शीलाताई गायकवाड ,विनय शिंदे, अहमद शेख, निजामशाह,अनिता खरात , विश्वरत्न भीमराज प्रतिष्ठाण चे अध्यक्ष रोहन आडसुळे , शिल्पा ताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .