पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत दिलेला अल्टिमेटम तसेच केलेले वक्तव्य व आंदोलन हे सर्वस्तरातून अयशस्वी झाले आहे. याउलट हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन अनेक ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण केले तसेच आरती व ईद मिलन कार्यक्रम आयोजित करून राज ठाकरे यांचा डाव हाणून पाडला आहे.तसेच आगामी काळात जनता मनसे च्या कोणत्या हि उमेदवारांना मतदान करणार नाही, पिंपरी-चिंचवड शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदार मतदान करणार नाहीत असे शाहनवाज शेख यांनी सांगितले आहे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात मतदारांना आवाहन केले आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका हि उमेदवाराला मतदान करू नये.
आगामी महानगरपालिका निवडणूक दोन आठवड्यात जाहीर करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने आता लवकरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या उमेदवारांना आता सुज्ञ नागरिक मतदान करणार नाही कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खरा जातीयवादी चेहरा नागरिकांच्या समोर आला आहे.
आपल्या शहरात तसेच राज्यात अनेक सामाजिक प्रश्न असताना, नागरिक अनेक असुविधा मुळे त्रस्त असताना, नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत जे सोडविणे आवश्यक आहेत महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, त्याचप्रमाणे अनेक उद्योगांना चालना मिळत नाहीये तसेच अनेक विकासाच्या बाबतीत व नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत असलेले प्रश्न या सर्व प्रश्नांना बगल देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जातीवादी तेढ निर्माण करणरे वक्तव्य करीत हिंदू मुस्लिम बांधवां मध्ये वैर निर्माण करणारी परिस्थिती निर्माण केली आहे.
त्यामुळे आता मनसे चा खरा चेहरा नागरीकांना समजला असून येत्या महानगरपालिका निवडणुकीत मनसे उमेदवार यांना कोणत्याही ही मतदारांनी मतदान करू नये असे आवाहन भोसरी विधानसभा मतदार संघातील युवा नेते शाहनवाज शेख यांनी केले आहे.
हिंदू-मुस्लीम दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न मनसेचा असून अशा जातीयवादी पक्षाला मतदारांनी त्यांची जागा दाखवावी व त्यांना मतदान करू नये.
पिंपरी-चिंचवड शहरात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले हे मागील पाच वर्षात मनसेचे एकमेव नगरसेवक होते परंतु त्यांनी आपल्या प्रभागात भरीव असे कोणतेही काम केलेले नाही आता तर त्यांच्या पक्षाचा जातीयवादी चेहरा मतदारांच्या समोर आला आहे त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मतदार आपला शहर हा मनसे मुक्त शहर करतील असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
किमान पिंपरी-चिंचवड शहरात तरी मनसेचा एकही उमेदवार नागरिकांनी निवडून देऊ नये व आपला शहर हा धार्मिक एकोपा राखणारा शहर, आधुनिक शहर याची एक वेगळी ओळख असल्याने ही ओळख कायम ठेवण्यात मतदार माझ्या या आवाहनाला ला प्रतिसाद देतील असेही यावेळी शाहनवाज शेख यांनी सांगितले.
भोसरी विधानसभा मतदार संघातून 2019 मध्ये निवडणूक लढविलेल्या शाहनवाज शेख यांनी आगामी महानगरपालिकेत आपण निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून आपण महानगरपालिका निवडणूक लढविणार की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी प्रभाग क्रमांक 13 मधील मनसेचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन चिखले यांच्या विरोधात ते नक्कीच निवडणूक लढवतील, कारण मागील काही दिवसापासून मनसेच्या विरोधात शाहनवाज शेख यांचे वक्तव्य येत आहेत त्यामुळे नक्कीच ते प्रभाग क्रमांक 13 मधून आगामी महानगरपालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत.