शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र पेढी यांच्यावतीने तसेच भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळ्यांचे ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, चष्मे वाटप होणार असून सदर शिबिर दिनांक २७ मे २०२२ ते ३० मे २०२२ या कालावधीत संपन्न होणार आहे. तसेच या शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेखर चिंचवडे यांनी केले आहे.
सदर शिबिर हे शेखर चिंचवडे यांचे जनसंपर्क कार्यालय, वृंदावन कॉलनी, गणेश सहकारी बँकेच्या मागे, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडे नगर, चिंचवड पुणे- ३३ येथे संपन्न होणार आहे. तसेच शिबिरा विषयीच्या अधिक माहितीसाठी ९९२१२५०१२३ / ९७६३४७०१२३ / ९७६३६८०१२३ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शेखर चिंचवडे यांनी केले आहे.