मुंबई
राज्यसभा निवडणुकानंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या 2 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या दोन नावांमध्ये भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. @NCPspeaks
Advertisement— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 9, 2022
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे.