शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड परिसरातील लहान मोठयांसाठी दरवर्षी चिंचवड मध्ये ‘क’ कॅलिग्राफी “सुंदर अक्षरांची शाळा” Umbrella painting workshop(छत्री रंगवा कार्यशाळा) मधुकर बच्चे युवा मंच वतीने आयोजित करण्यात आली. कोरोना मुळे गेली दोन वर्षे हा उपक्रम घेता आला नव्हता.
या वर्षीही चिंचवड मध्ये लहान- मोठयांसाठी मधुकर बच्चे युवा मंच वतीने कै. मुरलीधर माचुत्रे व्यायामशाळा चिंचवड येथे आंब्रेला पेंटिंग (छत्री रंगवा )कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यास परिसरातील लहान मोठयांनी चांगला प्रतिसाद दिला.
‘क’ कॅलोग्राफी संस्थेचे मुख्य मा. शरद कुंजीर व अर्चना कुंजीर यांनी कार्यशाळेचे परीक्षण केले. अक्षय रसाळ,कांचन निकुंभ, सचिन खाडे,राहुल फाफळे,अभिनंदन इंगळे,अविनाश निमसे आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले. परिसरातून नागरिकांना अश्या उपयुक्त उपक्रमांची आवड राहावी व यातुनच नागरिक मोठी कला कृती तयार करू शकतात म्हणून असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहे पुढेही असे उपक्रम नक्की घेतले जातील, असे महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य:मधुकर बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे प्रमुख:शरद कुंजीर यांनी सहभागी झालेले व पाहण्यास आलेल्यांचे स्वागत करून प्रस्थाविक केले तर सौ.अर्चना कुंजीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.