शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ वतीने आदर्श पत्रकार म्हणून दिला जाणारा भा.वि. कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार यावर्षी शिवाजीराव शिर्के, ज्येष्ठ पत्रकार (संपादक पवनेचा प्रवाह) यांना जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार रविवार २५ सप्टेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते दिला जाणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे असतील हा कार्यक्रम रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले सभागृह डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी, येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले तसेच विभागीय सचिव अरुण उर्फ नाना कांबळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.