शिवसेना शाखेत फराळ कार्यक्रमाचे आयोजन
शबनम न्युज | दापोडी
दिपावली सणानिमित्त दापोडी शिवसेना विभागाच्या वतीने कार्यालयामध्ये शिवसेना उपशहर प्रमुख तुषार नवले यांच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा देवून महिलांना पणत्या वाटप करण्यात आल्या.
या प्रसंगी विभाग प्रमुख राजू सोलापूरे, सामाजिक कार्यकर्त्या जन्नत ताई सय्यद , विभाग संघटक सुनील ओव्हाळ विभाग समन्वयक अतुल कुदळे, शाखा प्रमुख महेन्द्र तांबे, रियाझ शेख, मा. शाखा प्रमुख प्रमोद गायकवाड, युवासेना अधिकारी जितेंद्र स्वामी, आदिनाथ किर्तीकर,भालचंद्र ढमाले, मयूर भिंगर्दिवे, अनिल पवार, याकोब केंगार इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच यावेळी मशाल पेटवून उद्धव साहेब ठाकरे आहे बढो… हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
तसेच या निमित्ताने सर्व मुस्लिम व ख्रिश्चन बंधु व भगिनी यांना दिवाळी निम्मित शिवसेना शाखेत फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार गौतम चाबुकस्वार, तुषार नवले, सचिन घाटे, विनोद जाधव, महेंद्र तांबे, कोमल जाधव प्रमुख उपस्थित होते.