शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सेनेट्री चाळ, भीम नगर, भाजी मंडई जवळ पिंपरी, पुणे येथे घडली असून, या विरोधात २४ वर्षीय महिला यांनी फिर्याद दिली आहे. लड्ड्या उर्फ हर्ष अमर (वय १९ रा. सेनेट्री चाळ, भीम नगर, भाजी मंडई जवळ पिंपरी, पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या शेजारी राहत असून, जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांनी आरोपी यांच्यावर एन. सी. दाखल केली होती, याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी यांच्या डोक्यात, कानाच्या पाठीमागे, हातावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने मारहाण केली. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंब करीत आहे.