शबनम न्युज | पुणे
(प्रतिनिधी | आर्यन नगराळे)
रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध, पुणे येथील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरुण आंधळे व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. ॲड. रवींद्र भारूड (उच्च न्यायालय, मुंबई) या मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.गजाला सय्यद व कु. रागिनी देशमुख यांनी संविधानाचे महत्त्व व संविधानाने महिलांना दिलेल्या अधिकार व स्वातंत्र्य यावर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना भारूड म्हणाले कि, या महाविद्यालयात मी १९९४ च्या बॅचचा माजी विद्यार्थी आहे. जेव्हा मी या महाविद्यालयात शिक्षणासाठी सायकलने येत होतो, तेव्हा अशी इमारत वगैरे काही नव्हती. आम्ही या विद्यालयात गुडघ्या इतक्या पाण्यात बेंच टाकून बसायचो. मी जेव्हा प्राथमिक शिक्षण घेत होतो तेव्हा मी प्रत्येक भाषणामध्ये भाग घेत असत होतो. पण तेव्हा माझा दुसरा किंवा तिसरा क्रमांक येत असे. पण जेव्हा मी १९९६ ला या महाविद्यालयात प्रथम भाषण घेतले तेव्हा या महाविद्यालयात माझा प्रथम क्रमांक आला होता व मला त्यावेळेसच्या महापौर कडून बक्षीस मिळाले होते. तसेच त्यांनी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण आंधळे म्हणाले कि, सासरी गेलेला मुलगा आज माहेरी परत आला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नाहीतर आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे ॲड. रवींद्र भारूड हे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत राहावे, नेहमी पुढचा विचार करून एक पाऊल पुढे टाकत राहावे, प्रत्येकाने बोलायला हवे, प्रयत्न करायला हवे.
यावेळी उपप्राचार्य, राज्यशास्त्र विभाग प्रमुख रमेश रणदिवे, इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ. सविता पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रभंजन चव्हाण, प्राध्यपिका स्वाती चव्हाण, प्राध्यपिका कल्याणी सोनवणे, प्राध्यपिका कल्पना कांबळे, प्राध्यापिका आसावरी शेवाळे आदी महाविद्यालयातील प्राध्यापक/प्राध्यापिका व विद्यार्थी/विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सायली गोसावी तर आभार प्राध्यापक सुशील कुमार गुजर यांनी मानले.