शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धा २२-२३ चे आयोजन दिनांक १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२२ अखेर कैलासवासी तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासा खाडी येथे संपन्न होत आहे. दरम्यान, दिनांक १५ डिसेंबर रोजी १४ वर्षाखालील मुलींच्या अंतिम स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय थेरगाव ने संघ २३ गुणांनी विजयी झालं असून विजेतेपद प्राप्त केले.
सदर सामन्यात रूपाली राठोड, डिंपल उड्डाणशिवे,अंजली पौळ,ऋतुजा चव्हाण यांच्या उत्कृष्ट चढाया आणि विद्या सलकमवाड,भारती किरवे, यंकमा पवार, आयुष्या बारणे यांच्या उत्कृष्ट पकड्या तसेच लक्ष्मी माटुळकर,कार्तिकी काकडे,मनीषा गायकवाड,प्राजक्ता केदारी या खेळाडूंच्या सहकार्याने माध्यमिक विद्यालय थेरगाव ने सहज विजेतेपद प्राप्त केले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक बन्सी आठवे यांचे मार्गदर्शन लाभले असून, शिक्षिका सोनाली जाधव यांचे सहकार्य लाभले. सर्व खेळाडूंचे माध्यमिक विद्यालय थेरगाव शाळेचे मुख्यध्यापक श्री. फुगे सर यांनी स्वागत केले.
उपांत्यफेरी –
सामना क्रमांक – १
१.ज्ञानप्रबोधिनी विद्या. निगडी वि. वि. रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी ( २८-३)
ज्ञानप्रबोधिनी निगडी हा संघ २५ गुणांनी विजयी
सामना क्रमांक – २
२. माध्यमिक विद्यालय थेरगाव वि.वि. गुरुगणेश विद्या. ( २४-१० )
माध्यमिक विद्यालय थेरगांव १४ गुणांनी विजयी,
तृतीय क्रमांकासाठीचा सामना
रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी वि.वि. गुरुगणेश विद्यालय. (२३-९) रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी १४ गुणांनी विजयी,
अंतिम सामना –
माध्यमिक विद्यालय, थेरगांव वि.वि. ज्ञानप्रबोधिनी विद्या, निगडी (३१-८)
माध्यमिक विद्यालय हा संघ २३ गुणांनी विजयी.