शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुण्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ही घटना गेल्या सहा महिने दरम्यान घडली आहे. ओम राजू तिंबोळे (रा. जय गणेश कॉलनी, विधाते वस्ती) जय राजू तेंबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम आणि किरण जाधव (सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने सुरुवातीला पीडितेचा चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला होता व तिचे फोटो काढले होते. त्या फोटोच्या साहय्याने तिला आता फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन सहा आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने नुकतेच तिच्या आईला तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली आणि त्यांनतर कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला.
याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या तरतुदींनुसार सामूहिक बलात्कार, लैंगिक अत्याचारापासून मुलांच्या संरक्षणाच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.