शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगर, चिंचवड स्टेशन येथील ट्रांसफार्मर मध्ये बिघाड झाल्याने तेथील वीज पुरवठा खंडित झाला होता. सदर वीजपुरवठा ८ ते ९ दिवस खंडित झाला असल्याने तेथील राहणाऱ्या रहिवाशांची , नागरिकांची गैरसाई होत होती. हे सर्व लक्षात घेता, तेथील माजी नगरसेवक शैलेश मोरे यांनी पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफॉर्मर (अंदाजे किंमत दहा ते पंधरा लाख रुपये) टाकून घेतला. त्यानंतर वीज पुरवठा चालू झाल्याने तेथील रहिवाशांनी शैलेश मोरे यांचे आभार मानले.
यापूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने शैलेश मोरे यांनी वरिष्ठ वीज पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून ट्रान्सफॉर्मर नवीन टाकून घेतला होता. परंतु अंडरग्राउंड केबल खराब झाल्याने वीज पुरवठा पुन्हा बंद झाला, त्यानंतर शैलेश मोरे यांनी या समस्यांचे निवारण करत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.