शबनम न्युज | पुणे
सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक 12 मार्च 2023 रोजी श्री.लक्ष्मीबाई बारणे उद्यानातील्, वाकड येथे विशेष (दिव्यांग) मुलांकरीता आठवे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये ५० पेक्ष्या अधिक विशेष ( दिव्यांग ) मुलांवर उपचार करण्यात आले. या शिबिराची सुरुवात 12 ऑगस्ट २०२१ पासून केली या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांग मुलांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार व लाभ सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.
या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात.या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांच्या मोफत आरोग्य तपासणीसह औषधे देण्यात आली. शिबिरामध्ये अनेकांनी लाभ घेतला आहे.
सदर शिबिर कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ.सम्युयल हनिमन्न यांच्या प्रेरणेने आयोजित केले जाते,तसेच सदर शिबीर कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आजपर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.पण त्यांच्या नंतर प्रेडीक्टीव होमिओपॅथीचे विद्यमान संचालक तरंग विजयकर तसेच डॉ. अंबरीश विजयकर यांनी हि सेवा अविरतपणे चालु ठेवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
सप्तर्षी फाउंडेशनने गेले अनेक वर्षे दिव्यांगा सोबत काम करत आहे, त्यासोबतच संस्थेच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी खालील प्रमाणे आहे.
१) सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा प्रकल्प.
२) बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार,
३) शीतऋतू मध्ये गरजू व्यक्तींना मोफत चादर वाटप,
४) दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण कार्य,गरजू,
५) होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत.
सदर कार्यक्रमात दोन विशेष मुलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कु. पृथ्वीराज इंगळे तसेच कु. मेहेक गोयल समावेश असून, पृथ्वीराज च्या नावे सलग गायन करण्याचे विक्रम नोंदविला असून त्याला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कु. मेहेक हिने देखील चित्रकलेमध्ये नाविन्य प्राप्त केले असून, विविध स्पर्धेमध्ये तिने पारितोषिक जिंकले आहेत. या दोन्ही मुलांवर त्यांच्या पालकांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळे आज त्यांनी कलाक्षेत्रात नाव कमविले आहे.
शिबिराचे उद्घाटन वाकड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री. मसाळ साहेब व सौ.दया इंगळे या मान्यवरांनी केले. सदर मान्यवरांनी उपस्थित राहून सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सप्तर्षी फाउंडेशन ला सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली.
या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे मुख्य समुपदेशक डॉ. रजत मालोकार, डॉ. सात्विक नारायण,
डॉ. मुस्कान मुलम, डॉ. तेजवीर कौर, डॉ. लिखिता रेड्डी, डॉ. जीविका भंडारी, डॉ. धवल शर्मा , डॉ. कांचन सिंग , डॉ. प्रिया सिंग, डॉ. हर्षिता दीप , डॉ. ऋषिकेश दागडे , डॉ. सौरभ गवळी , डॉ. हनी ओसवाल , डॉ. शिवानी पाल, डॉ. शिवप्रताप सिंग, डॉ. रुचिता बुरात , डॉ. तन्मय जगताप , डॉ. हेमंती सोनवणे , डॉ. रेणुका भिडे, डॉ. निवेदिता हांचे,इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.
सप्तर्षी फाउंडेशन चे संस्थापक सचिव श्री.मनोजकुमार बोरसे, सौ.रूशाली बोरसे तसेच कु. प्रथमेश कदम संस्थेच्या वतीने उपस्थीत होते. सदर कार्यक्रमास सौ.चंद्रिका सुतार, कु.हर्षल सुरुशे, भूषण गायकवाड, विशाल गंधूरे, स्नेहल गंधूरे , महेश चौधरी इत्यादी स्वयंसेवकांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे योग्य नियोजन श्री सतीश ढगे साहेब यांच्यातर्फे करण्यात आले तसेच श्री. ढगे यांना सप्तर्षीच्या स्वयंसेवक समिती चे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.
सप्तर्षी फाउंडेशन च्या विविध सामाजिक उपक्रमांना आज पर्यंत कोणतेही शासकीय तसेच कंपन्याकडून अर्थसहाय्य मिळू न शकल्याने संस्था चालविताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती तसेच कंपन्यांना सहकार्य करण्याचे आवाहन श्री मनोजकुमार बोरसे यांनी केले.
संस्थेचे संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैशालीताई मुळे, सचिव श्री. श्रीकांत चव्हाण व सदस्य श्री. वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते. त्याबद्दल श्री मनोज बोरसे यांनी त्यांचेही आभार मानले.
*शिबिरास उपस्थित असणाऱ्या काही पालकांचे अभिप्राय खालील प्रमाणे –
दीपक घोडके-“माझ्या मुलाला आणायला मी तीन वेळेला कॅम्पमध्ये घेऊन आलो आता अनय मध्ये खूप चांगली प्रगती दिसत आहे सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांचे खूप खूप धन्यवाद.”
सौ. दया सतीश इंगळे- “सदर कॅम्प बघून कै. डॉक्टर प्रफुल्ल विजयकर सर यांनी पूर्वी महाबळेश्वर मध्ये घेतलेल्या कॅम्पची आठवण आली. विशेष मुलांची सेवा ही ईश्वर सेवा असून सप्तर्षी फाउंडेशनला या कार्याबद्दल शुभेच्छा.”