शबनम न्यूज मावळ प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यातील शिरगाव मधील शिरगाव चे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांचा एक एप्रिल रोजी निर्घुण पणे खून करण्यात आला यानंतर पोलीस कारवाईत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली संपूर्ण मावळ तालुक्यात शिरगावचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांच्या भ्याड हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणात एका बड्या नेत्याने राजकीय हस्तक्षेप करत निरपराध लोकांना या खून प्रकरणात गोवले . असल्याने या हत्येची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी करून हत्येतील खऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावे, या आशयांचे पत्र मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना पाठवले असल्याचे यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी सांगितले.
जनसेवा विकास समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आवारे बोलत होते. पत्रकार परिषदेत संस्थापक किशोर आवारे, समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, नीलेश पारगे, वृंदा महेश भेगडे, योगिता ओव्हाळ आदी उपस्थित होते.
किशोर आवारे म्हणाले, गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी पोलिस प्रशासनाने सहा तासांनंतर गुन्हा दाखल केला. यामध्ये प्रमुख साक्षीदार असणारा एक ग्रामपंचायत सदस्य हल्ला झालेल्या ठिकाणी उपस्थित असूनही कुठल्याही प्रकारे तोंड न झाकलेले मारेकरी ओळखले नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. या प्रकरणातील संशयित महेश भेगडे, मनीष ओव्हाळ व अशोक कांबळे यांना खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही अटक चुकीची असून, यात एका नेत्यामार्फत हस्तक्षेप झाला असून, मुद्दाम या प्रकरणात या तिघांना गोवण्यात आले असल्याचा आरोप किशोर आवारे यांनी केला. हत्याप्रकरणी आरोपी आणि फिर्यादी अशा दोघांनाही एकाच वेळी फोन करून संभ्रम निर्माण करणाऱ्या तालुक्यातील त्या बड्या नेत्याची चौकशी सीबीआय अथवा सीआयडीमार्फत करण्यात यावी. असे पत्रकार परिषदेत सांगितले.