शबनम न्युज | शिरूर
शिरूर मध्ये एका परप्रांतीय युवकाने सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचे संतापजनक घटना समोर आली आहे. पाचू हादरा असे आरोपीचे नाव असून, शिरूर पोलिसांनी त्याला काही तासाच्या आतच बेड्या ठोकल्या आहे.
शिरूर शहरात राहणारी एक महिला सायंकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करत असताना तिची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. दरम्यान पाचू हादरा याने या चिमुरडीला बाजूच्या खोलीत घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिची आई शेजारील घराकडे पळत गेली असता, तिला आपल्या बालिकेवर पाचू हादरा अत्याचार करत असल्याचे दिसले. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्यानंतर पाचू हादरा पळून गेला. याबाबत पीडित बालिकेच्या आईने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाचू हादरा याला शिरूर पोलिसांनी अटक केली.
चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधमाला कडक शासन करा, वासनाध आणि विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय निंदनीय आहे. हे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शासन करा, अशी मागणी कुटुंबीय आणि महिला संघटनांकडून होत आहे.