शबनम न्यूज , पिंपरी चिंचवड, प्रतिनिधि :
पिंपरी चिंचवड शहरातील श्री प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पिंपरी चिंचवड शहरातील वाळके अकॅडमी दिघी येथे येथे PCTCAअंतर्गत भव्य पिंपरी चिंचवड 40+ चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रीमियर लीग चे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात 5 जून रोजी संपन्न झाले.
यावेळी PCTCA चे अध्यक्ष कैलास लांडगे व उपाध्यक्ष संदीप नाणेकर प्रामुख्याने उपस्थित होते या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघाला 31 हजार रुपये रोख व भव्य चषक देण्यात येणार आहे तसेच द्वितीय पारितोषिक 21 हजार रुपये रोख व भव्य चषक देण्यात येईल तसेच तृतीय पारितोषिक भव्य चषक व चतुर्थ पारितोषिक भव्य चषक असेल या क्रिकेट स्पर्धेत अविनाश भाऊ लांडगे यांचे तात्या ई स्पोर्ट्स, चंद्रशेखर मोरे यांचे संविधान ग्रुप, सतीश भाऊ कुठे यांचे बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स, गणेश भालेकर यांचे सहारा 11, इंद्र भोजने यांचे पार्थ इलेव्हन, संदीप भाऊ झेंडे यांचे मल्हार स्पोर्ट्स, सुनील परांडे व धीरज गायकवाड यांचे दिघी इलेव्हन तसेच अनिल रोकडे यांचे चिखली फायटर संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे त्यांना खेळाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून या प्रीमियरलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशांत सपकाळे यांनी दिली.
या प्रीमियर लीगला राष्ट्रवादीचे नियोजन समितीचे अध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले यावेळी अकबर भाई मुल्ला यांचा सन्मानही करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली