शबनम न्युज | पुणे
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कलावर्धिनी संस्थेतर्फे ‘अनुग्रह ‘या भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी(मयूर कॉलनी, कोथरूड )सभागृहात ३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.’वारसा ‘आणि ‘परंपरा’ अशा दोन सत्रात हा कार्यक्रम होणार असून ‘वारसा’ मध्ये स्मिता महाजन,रमा कुकनूर,वृषाली चितळे-लेले ,शिल्पा देशमुख, केतकी नेवपूरकर यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.
‘ परंपरा’ या सत्रामध्ये ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ.सुचिता भिडे-चापेकर,अरुंधती पटवर्धन, सागरीका पटवर्धन यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.डॉ.सुचिता भिडे-चापेकर,त्यांची कन्या-शिष्या अरुंधती पटवर्धन आणि नात सागरीका पटवर्धन या ३ पिढ्यांतील कलाकारांचे नृत्य सादरीकरण होणार आहे,हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय आहे.
Advertisement