शबनम न्यूज | मुंबई
प्रफुल्ल पटेल यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्पीच तयार करून देतात. मोदी शहा सांगतील तसं प्रफुल्ल पटेल यांना बोलावं लागतं. नाही बोललं तर फॉर्म्युला ठरलेला आहे. सत्तेत या, नाहीतर जेलमध्ये जा, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली.
पुढे ते म्हणाले, “हे लोक कशासाठी गेले आहेत, त्यांचे आलेखन पवारांनी त्यांच्या प्रेस मध्ये केले आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाया कोणा कोणावर चालले आहेत, हे त्यांनी वाचून दाखवले. मोदी आणि शहा जेवढं सांगतात, त्या पलीकडे काहीही करता येत नाही, असा हल्लाबोल ही त्यांनी यावेळी केला.
Advertisement