शबनम न्यूज’ प्रतिनिधी ;
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पिंपरी चिंचवड मधील फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि उद्योजकांची भेट घेतली एमआयडीसी परिसरात उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत अध्यक्ष अभय भोर आणि उद्योजकांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली आहे
. भेटीमध्ये एमआयडीसी परिसरात जाणवणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले
महानगरपालिका कर घेत असून त्या प्रमाणात कोणतीच मूलभूत सुविधा पुरविली जात नाही अनेक उद्योजकांना 2019 पासून कचऱ्यावरचा उपकर लावण्यात आलेला आहे हे उद्योजकांना मान्य नसून मूलभूत सुविधा नसताना अशा प्रकारे कर लावणे म्हणजे शासनाचा उद्योजकांकडून खंडणी घेत असल्यासारखे दिसून येते उद्योजकांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे दिसून येते आणि याच प्रकारे शासनाचे धोरण असल्यास उद्योजकांना आंदोलनाचा पवित्र घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शी बोलताना सांगितले
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्योजकांना आश्वासन दिले लवकरात लवकर उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या सोडविल्या जातील असे आश्वासन देण्यात आले
यावेळी उपस्थित उद्योजक संजय भोर उद्योजक जसबिंनदर सिंग, उद्योजक ,उद्योजक प्रमोद गायकवाड , उद्योजक राम जोगदंड जेटप्पा पुजारी उमेश कुलकर्णी इतर उद्योजक उपस्थित होते