शबनम न्यूज , प्रतिनिधी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना यमुनानगर शाखा तसेच पुणे जिल्हा संघटिका सौ सुलभाताई रामभाऊ उबाळे व युवासेना शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांच्या वतीनें 10 वी व 12 वी मधील गुणवंत विध्यार्थ्यांचा भेटवस्तू ,प्रमाणपत्र व वाचनाची आवड निर्माण करण्यास पुस्तक भेट करून गौरविण्यात आले .
कार्यक्रमास 116 विध्यार्थी 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विध्यार्थी होते तसेच प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक 10 वी 12 वी च्या विध्यार्थ्यांना रोख पारितोषिक सुद्धा देण्यात आले , 10 वी मध्ये प्रथमेश फुलारी यास 95.60 टक्के व 12 वी मध्ये समृद्धी काकडे हिस 93.70 टक्के गुण मिळवून विषेश प्राविण्य मिळवले . कार्यक्रमास शिवसेना भोसरी विधानसभा संघटक अंकुश जगदाळे , युवासेना जिल्हा प्रमुख सचिन सानप , सौ शुभांगीताई बोऱ्हाडे , निर्मला पाटील , सौ कावेरी परदेशी , सौ भारती चकवे , उपविभाग प्रमुख श्री गणेश इंगवले , युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री अमित शिंदे , शाखा प्रमुख श्री महेश डोके , प्रसिद्धी प्रमुख श्री सार्थक दोशी, श्री किरण वाडकर , श्री संतोष गायकवाड, श्री ढमाले काका , तसेच शिवसेना , युवासेना , महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सौ सुलभाताई उबाळे यांनी पालकांचे सुध्दा अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या ।।