शबनम न्युज | पिंपरी
कै.सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक ३१/०७/२०२३ रोजी सायं ६ वा मनीषा स्मृती निवास भोईर नगर, चिंचवड येथे संपन्न झाला सदर भजन स्पर्धे मध्ये एकूण ३२ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
भजन स्पर्धे मध्ये इंदिरानगर,चिंचवड येथील संतोषी मा महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला (स्मृती चिन्ह व रोख र.रु. ५००१). रस्टन कॉलनी चिंचवड येथील दत्त प्रासादिक महिला भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक (स्मृती चिन्ह व रोख र.रु. ३००१) व जोगेश्वरी महिला भजनी मंडळाने तृतीय क्रमांक (स्मृती चिन्ह व रोख र.रु. २००१) प्राप्त केला. चिखली येथील शिवतेज महिला भजनी मंडळ, राधाकृष्ण महिला भजनी मंडळ तसेच सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, संभाजीनगर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. (स्मृती चिन्ह व रोख रु. १००१). स्वरांजली महील भजनी मंडळातील कान्होपात्रा पवार यांना व्ययक्तिक पखवाजवादक, जोगेश्वर महिला भजनीमंडळातील कस्तुरी जमखंडी यांना हार्मोनियमवादक म्हणून तर रेणुका भजनी मंडळाच्या रामेश्वरी कुडाळकर यांना उत्कृष्ट गायक म्हणून बक्षिसे (रोख र.रु.५०१) देण्यात आली व सर्व मंडळांना सहभागी झाल्याबद्दल रोख रककम .रु.१००० देण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान परीक्षक म्हणून ह.भ.प. मधुकर महाराज मोरे आणि श्री उमेश विठ्ठल पुरोहित यांनी परीक्षण केले. बक्षीस वितरण सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा सौ. कविताताई आल्हाट, मा नगरसेविका सौ. वैशालीताई काळभोर, मा. नगरसेवक श्री सुरेश भोईर, श्री राजभाऊ गोलांडे, श्री आप्पा बागल, श्री विठ्ठल नाना काटे तसेच गतीराम भोईर, दत्तात्रय साकोरे सौ किरण हर्षवर्धन भोईर, ह.भ.प नीलम शिंदे ई मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले सूत्र संचालन संतोष पाटील यांनी केले व आभार सौ. नीलम शिंदे यांनी मानले