शबनम न्युज | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देहूरोड युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष मलिक शेख यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी .एतेहासिक सुभाष चौक देहूरोड येथे महात्मा गांधी यांच्या विचारांना उजाळा देते जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा गांधींनी अहिंसा , सविनय या मार्गाने अनेक सत्याग्रह करुन इंग्रजांना नामोहरम केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा जगातील अनेक पारतंत्र्यातील देशांनी घेऊन इंग्रजांच्या वसाहत वादाविरुध्द लढा दिला.
या वेळी तालुका अध्यक्ष राजेश वाघोले , अल्पसंख्यांक मावळ तालुका अध्यक्ष गफूरभाई शेख,तालुका उपाध्यक्ष रईस शेख, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजन, अल्पसंख्याक अध्यक्ष मेहबूब गोलंदाज,शहर उपाध्यक्ष असिफ सय्यद, उपाध्यक्ष निलेश बोडके, अनु अनपे, राहुल सातरे, आदी उपस्थित होते