शबनम न्युज | पुणे
यंदा वर्ल्डकप मध्ये रंगतदार सामने सुरू आहेत. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान वर एकतर्फी विजय मिळवत संघाची ताकद दाखवून दिली. यंदाच्या वर्ल्डकप साठी तिकीट विक्री फुल झाली असून, वर्ल्डकप मधील एखादे सामने पहावा, म्हणून क्रिकेट प्रेमी ऑनलाईन टिकण्यासाठी बुकिंग करत आहेत. तसेच पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर ही 5 सामने होणार आहेत. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष बसची सोय करण्यात आली आहे.
गहुंजे येथे क्रिकेट विश्वचषकातील होणाऱ्या सामन्यासाठी पुण्यातील गहुंजे मैदानावरील पाचपैकी 4 सामने हे डे-नाईट होणार आहेत, तर एक सामना दिवसा खेळवला जाणार आहे. 19, 30 ऑक्टोबर 1 आणि 8 नोव्हेंबर रोजी दिवस रात्र सामने खेळवले जाणार आहेत. तर 11 नोव्हेंबर रोजी एकमेव सामना दिवसा होणार आहे.
या सामन्यांसाठी पुणे मनपा भवन येथून सकाळी 11,11.35 ,12.5 या वेळेला बस सुटतील, तर कात्रज बायपास इथून सकाळी 11 आणि 11.30 वाजता बस सुटेल तर निगडी टिळक चौकातून दुपारी 12 आणि 12.30 वाजता बस सुटणार आहे. डे नाईट सामन्यासाठी मनपा येतो. सकाळी 8.25 ,8.50 , 9 .50 अशा तीन बस सोडण्यात येतील तर कात्रज बायपास येथून सकाळी 8.15 व 8.35 या दोन बस असणार आहेत. निगडी टिळक चौकातूनही सकाळी ८.30 व 9 वाजता बस सुटणार आहेत.