शबनम न्युज | पिंपरी
कर्वेनगर, पुणे येथे झालेल्या पुणे विभागीय ऐक्रोबैटिक्स आणि जिम्नॅस्टिक स्पर्धेत रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या मुलींच्या व मुलांच्या संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. या दोन्ही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मुलींच्या संघात (त्रिदल) स्वामिनी घुले, ऐश्वर्या गवळी (इयत्ता नववी), हर्षाली चिंचवडे (इयत्ता आठवी) तर मुलांच्या गटात (दुहेरी) अथर्व आवटे इयत्ता सातवी, अमित कोडगानुरा (इयत्ता सहावी) यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी विजयी संघास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या