शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मध्ये तुळशीविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .
तुळशी विवाहासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पारंपारिक पद्धतीने प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली. मुख्य दरवाजा पासुन वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुगांच्या गजरात ढोलताशांच्या आवाजात सभागृहापर्यंत मिरवणूक आणण्यात आली. सुबक रांगोळीने संभागृहाचे प्रवेशद्वार सुशोभित करण्यात आले. विद्यार्थ्यानी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. तुळस व श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक ह.भ.प. श्री. राजू महाराज ढोरे, संचालक श्री. अभय टिळक, संचालिका डॉ. श्रीम. स्वाती मुळे तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. श्री. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका श्रीम. स्नेहल पगार, समन्वयिका श्रीम. मयुरी मुळुक, सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.