शबनम न्युज | पुणे
डॉ.कर्नल अनिल आठल्ये(निवृत्त) लिखित ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवार,दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र,भारतीय विद्या भवन जवळ,सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे.भारतीय विद्या भवन आणि इंडस सोर्स बुक्स यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे आणि ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी श्रीनिवासराव सोहोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण,नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्यावर हे पुस्तक आधारित आहे.डॉ.कर्नल अनिल आठल्ये(निवृत्त)हे निवृत्त लष्करी अधिकारी असून संरक्षण मंत्रालयाच्या युद्ध अध्ययन विभागाचे माजी प्रमुख आहेत. ‘युद्ध कौशल्यांच्या बाबतीत अलेक्झांडरला ‘ अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणतात ,तशीच महान कौशल्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याने हे पुस्तक लिहिले आहे’,असे डॉ.अनिल आठल्ये यांनी सांगितले.