शबनम न्युज : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शिवसेनेचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्यात युवा सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये मावळ लोकसभा युवासेना जिल्हाप्रमुख पदी राजेंद्र तरस यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्रात तसेच पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची युवासेना बळकट व्हावी याकरिता विविध पदांवर 272 पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले अशी माहिती युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे यांनी दिली.
आगामी मावळ लोकसभा निवडणुकी करिता सदर युवासेना पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी महत्त्वाची मानली जात आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग आप्पा बारणे हेच महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
किवळे विकास नगर परिसरात आपल्या समाजकार्यातून समाजात आपल्या नावाचा ठसा उमटविणारे राजेंद्र तरस यांना मावळ लोकसभा युवासेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती मिळाल्याने मावळमध्ये तसेच किवळे व विकास नगर परिसरात युवा सेनेची ताकद नक्कीच वाढणार आहे. सामान्य नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याची काम राजेंद्र तरस शिवसेनेच्या माध्यमातून आजपर्यंत करत आले आहेत. आपल्याला मिळाल्या जबाबदारीचे आपण सोने करणार असून युवासेना घराघरात पोहोचणार असल्याचे तसेच शिवसेना पक्ष बळकट करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले