शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे चौकात नऊ तारखेला शनिवारी वृषाली भालेकर यांचा अपघाती मृत्यू झाला ही घटना वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे घडली त्यामुळे तळवडे ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. पोलीस आयुक्तांनी तळवडे येथील वाहतूक समस्या पंधरा दिवसात न सोडविल्यास तळवडे ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.
तळवडे ग्रामस्थांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर ,माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनवणे ,शरद भालेकर, विनायक पिंजन ,अनिल भालेकर, तुकाराम भालेकर, प्रवीण पिंजन, शरद गोपाळ भालेकर, अशोक भालेकर, रमेश बाठे, बाजीराव भालेकर ,दीपक बोर्डे, भरत कामटे ,बाळासाहेब नखाते आदी उपस्थित होते. तळवडे चौक ,त्रिवेणी नगर चौक येथे नियमित वाहतूक नियमन करणारे पोलीस नियुक्त करावे अशीही यावेळी ग्रामस्थांनी मागणी केली.