शबनम न्यूज, प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात हॉटेल इलेव्हन २३ चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तथा समाजसेवक विश्वनाथ मनोज जरे यांच्या मालकीचे इलेव्हन ट्वेंटी थ्री हॉटेल शहराच्या नावलौकिकात भर घालणारे तारांकित हॉटेलचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी महिला अध्यक्ष कविता अल्हाट, माजी नगरसेविका वैशाली घोडेकर , माजी नगरसेविका मंगला कदम,वसंत मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होतानाच मनोज जरे व नीलिमा मनोज जरे यांच्या वतीने अजित पवार यांना विठ्ठल मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितितांचे नीलिमा जरे यांनी आभार व्यक्त केले.