शबनम न्युज | मुंबई
आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार आहे. आज सायंकाळी सदर निकाल लागणार असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सदर निकालाचे वाचन होणार आहे. ठाकरे गटाकडून एक वकील उपस्थित राहणार आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. दोन्ही गटातील नेते या संदर्भात प्रतिक्रिया देखील देत आहे. आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, विजय आमचाच होणार, पराभव होणार हे ठाकरे यांनी मान्य केले आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.
अपात्रतेची टांगती तलवार असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार कोण?
- अजय चौधरी
- रवींद्र वायकर
- राजन साळवी
- वैभव नाईक
- नितीन देशमुख
- सुनील राऊत
- सुनील प्रभू
- भास्कर जाधव
- रमेश कोरगावंकर
- प्रकाश फातर्फेकर
- कैलास पाटील
- संजय पोतनीस
- उदयसिंह राजपूत
- राहुल पाटील
अपात्रतेची टांगती तर असणारे शिवसेना शिंदे गटातील आमदार कोण?
- एकनाथ शिंदे
- चिमणराव पाटील
- अब्दुल सत्तार
- तानाजी सावंत
- यामिनी जाधव
- संदिपान भुमरे
- भरत गोगावले
- संजय शिरसाठ
- लता सोनवणे
- प्रकाश सुर्वे
- बालाजी किणीकर
- बालाजी कल्याणकर
- अनिल बाबर
- संजय रायमुळकर
- रमेश बोरनारे
- महेश शिंदे