शबनम न्युज | पुणे
गोवा स्केटिंग फेस्टिवल या राष्ट्रीय स्तरावरील रोलर्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या प्रणव प्रविण गुंड याने दोन पदके पटकावली आहेत. स्पोर्ट्स एलयुपी संस्थेच्या वतीने गोव्यात नुकत्याच आयोजित या स्पर्धेत भारतभरातील विविध राज्यातून ५ ते १६ या वयोगटातील जवळपास ३०० स्पर्धक सहभागी झाले होते.
प्रणवला या स्पर्धेत लाँग रेसमध्ये तिसरा, तर शॉर्ट रेसमध्ये दुसरा क्रमांक मिळाला. प्रणव गेल्या वर्षभरापासून मिरॅकल स्केटिंग क्लबमध्ये या स्पर्धेसाठी सराव करत होता. विठ्ठल जाधव यांच्याकडून प्रणव प्रशिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी ही निवड फेरी होती. यामध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे.
प्रणव जयवंत पब्लिक स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकत आहे. शाळेमध्ये तो विविध स्पर्धेत भाग घेत असतो. जयवंत पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, क्रिडा शिक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सहकारी विद्यार्थ्यांनी प्रणवचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रणवचे आई-वडील डॉ. मिनाक्षी व डॉ. प्रविण गुंड दोघेही आयुर्वेदीय डॉक्टर आहेत. प्रणवला दोघेही सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. डॉ. प्रविण गुंड हे पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिक येथे सिनियर डॉक्टर, तर डॉ. मिनाक्षी आयुर्वेद कन्सल्टंट व योगा ट्रेनर आहेत. प्रणवने गेल्या वर्षी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विश्वविक्रम केला होता.