शबनम न्युज | मुंबई
आलिया भट्ट बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच तिने निर्मितीतही आपले कौशल्य दाखवले आहे. आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असलेल्या आलियाने तिच्या नवीन चित्रपटासाठी YRFशी हातमिळवणी केली आहे. आतापर्यंत या अफवा होत्या, मात्र आता या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. आलिया आता YRF च्या स्पाय युनिव्हर्स विश्वाचा एक भाग बनली आहे. ती लवकरच स्पाय युनिव्हर्स विश्वाच्या एका मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
आलिया भट्टच्या या नव्या प्रोजेक्टचा खुलासा यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधिनी यांनी केला आहे. मंगळवारी फिक्की फ्रेम्स दरम्यान, स्पाय युनिव्हर्स आणि आलिया भट्टच्या या नवीन चित्रपटाबद्दल बोलले. यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधान यांनी सांगितले की YRF स्पाय युनिव्हर्स ही एक फ्रँचायझी आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या चित्रपटातील पात्र एकमेकांना भेटताना दिसतील. सलमान खानचा ‘टायगर’, हृतिक रोशनचा ‘वॉर’ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ हे YRF स्पाय युनिव्हर्स विश्वाचा भाग आहेत.
अक्षय म्हणाला की तो या इंडस्ट्रीचे एक रहस्य शेअर करणार आहे, ते म्हणजे आलिया भट्ट एका स्पाय युनिव्हर्स चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंग शेड्यूल या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल. या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशातही होणार आहे.