पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी या ग्रेड सेपरेटर मार्गावर नव्याने स्वतंत्रपणे मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे या जलवाहिनी द्वारे दापोडी व सांगली परिसराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे या कामासाठी माजी नगरसेविका स्वाती उर्फ माईकाटे यांनी प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.
शहराची लोकसंख्या सुमारे तीस लाखांच्या घरात गेली आहे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे पवना नदीतून शहरासाठी नियमितपणे 510 एम एल डी एमआयडीसीचे 30 एम एल डी आणि आंध्रा धरणाचे 50 एम एल डी असे एकूण 590 एमएलडी पाणी सद्यस्थितीला शहराला कमी पडते, परिणामी प्रशासनाला दिवस आड पाणीपुरवठा करावा लागला आहे.
दरम्यान दापोडी सांगवी आणि परिसरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी निगडीच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून ते दापोडी पर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे पाणीपुरवठा विभागाकडून 1000 मिलिमीटर व्याजाची मुख्य जलवाहिनी असेल शेवटच्या भागात जलवाहिनी सहाशे मिलिमीटरची राहणार आहे यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे 58 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे सदर जलवाहिनी निगडीच्या भक्ती शक्ती समूह शिल्पाच्या बाजूने सर्विस रस्त्याने दापोडी पर्यंत नेण्यात येणार आहे या स्वतंत्र जलवाहिनी मुळे शहराच्या शेवटच्या भागापर्यंत म्हणजेच दापोडी व सांगवी परिसरात पाणीपुरवठा सक्षम होण्यास मदत होणार आहे.
शहराची गरज ओळखून निगडी ते दापोडी अशी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याबाबत महापालिका प्रशासना कडे सातत्याने आम्ही पाठपुरावा केला त्याला यश मिळाले याबाबत महापालिका प्रशासनाचे आभार या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावे ज्यामुळे दापोडी यांनी सांगवी परिसरातील पाणीपुरवठा सक्षम होईल. स्वाती काटे ,माजी नगरसेविका