शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची मागणी मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना पत्राद्वारे केली आहे.
आयुक्तांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये वाघेरे म्हणाले कि,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नवीन जिजामाता रुग्णालय २०२० मध्ये सुरु करण्यात आले होते. एकूण १२० खाटांची क्षमता असलेले रुग्णालय अत्याधुनिक यंत्रसामुग्री व मनुष्यबळाच्या कमतरता असल्यामुळे पूर्ण क्षमतेने नागरिकांना वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी नागरिक माझ्याकडे वारंवार मागणी करीत आहे.
नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये डायलेसिस,२ डी.इको,सि.टी.स्कॅन,एम.आर.आय. C arm machine for orthopedic surgeries,SWD…short wave diathermy machine for physiotherapy, advanced dental treatments like root canal , root cap bubble CPAP machine, HFNC..high flow nasal c pap machine , pediatric ventilators, laproscopic surgery instruments,medicines regarding primary infertility treatment & IUI , IVF, dental x ray of upper & lower jaw,OPG advanced sonography machine with all necessary probes, microbiology department to do tests like urine culture, blood culture या मशीन उपलब्ध झाल्यास तसेच MD MEDICINE,MS GEN.SURGERY,MS CARDIOLOGIST,UROLOGIST,NEPROLOGIST, NEUROLOGIST,ENT, OPHTHALMOLOGY,PSYCHIATRIST हे तज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्यास नवीन जिजामाता रुग्णालय पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा देणेकरीता सक्षम होणार आहे. शहरातील गरीब गरजू रुग्णांना सेवा मिळणेकामी वरील सुविधा देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी आयुक्तांना केली आहे.