शबनम न्युज | पिंपरी
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मधुकर बच्चे युवा मंच,चैतन्य फार्मा ग्रुप,चैतन्य व डॉ लाल पैथ लॅब्स , समर्थ एंटरप्रायजेस व पॉईंट ऑफ केअर बायो मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने केशवनगर चिंचवड येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शुगर,वजन,ब्लेडप्रेशर,आदी चाचण्या मोफत करण्यात आल्या तसेच शिबिरात सहभागी नागरिकांना तीन लक्की ड्रॉ बक्षिसे ठेवण्यात आली होती.
प्रथम बक्षीस:ग्लुकोमीटर व थर्मामीटर द्वितीय : ग्लुकोमीटर त्रितिय:थर्मामीटर अशी बक्षिसे देण्यात आली.
शिबिरात चिंचवड परिसरातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे भाजपा महिला मोर्चा सचिव पल्लवी पाठक यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. चैतन्य लॅब्सच्या अर्चना बच्चे,पॉईंट ऑफ केअरचे सुधीर मगर, रोहिणी बच्चे,पोपट बच्चे,गणेश बच्चे,काजल बच्चे -गावडे,मधुर पाठक,अक्षय गारगोटे, श्रावणी बच्चे,असावरी बच्चे, आदिनी शिबिरात पुढाकार घेतला.